Speech by Her Excellency the President of India, Shrimati Pratibha Devisingh Patil, at the Inauguration Sant Gulabrao Maharaj Sahitya Sammelan and Knowledge Pilgrimage Networking Mission at Alandi in Maharashtra

MAHARASHTRA : 11.10.2008
मराठी
श्री संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळाने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये म्हणजेच आजच्या आळंदी नगरीमध्ये श्री संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहेपसायदान म्हणजे मानवतेला पडलेले एक महन्मंगल स्वप्नच आहे. मानव कल्याणाचा इतका भव्य, विशाल, दूरगामी, भारदस्त, पवित्र आणि निर्मळ विचार मानवी इतिहासात मिळणे अवघड आहेअर्थात ज्यास ज्या प्रक्रियेने आत्मानुभव येईल तीच प्रक्रिया त्याच्यासाठी उत्तम असते. असा निश्चय ठेवून प्रत्येकाने स्वमताचा दुराग्रह धरू नये. तसेच परमताचा द्वेषही करु नयेत्यामुळे आपण प्रेमादाराने त्यांना मधुराद्वैताचार्य म्हणतो. भक्ती, वेदांत, सांख्य, योग, न्याय, आयुर्वेद, संगीत, साहित्य, नाटक, व्याकरण, कोश, क्रीडा, लिपी इ. अनेक विषयांवरील 'सूत्र' आणि भाष्य रचनेपासून प्रकरण ग्रंथापर्यंत विविध प्रकारची ग्रंथनिर्मिती करुन त्या त्या शास्त्रात महाराजांनी नवनवे मौलिक योगदान दिलेपश्चिमी देश फक्त भौतिकतेकडेच लक्ष देतात पण 'यापुढे काय?' यासाठी मात्र ते देश आपणाकडे पाहताना दिसतात. अशावेळी श्री संत गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयाचे सर्व भाषांत भाषांतर होणे गरजेचे वाटते नव्हे ती काळाची गरज आहे

 

Subscribe to Newsletter

Subscription Type
Select the newsletter(s) to which you want to subscribe.
The subscriber's email address.